लेवीय 20:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहील व ती त्याची काया पाहील तर हा निंद्य प्रकार होय; त्यांच्या भाऊबंदांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा. त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी. Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली पत्नी करून घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी. Se kapitlet |