इब्री 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’ Se kapitletइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला. Se kapitletपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तो परमेश्वराच्या वैभवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने विश्वाधार आहे आणि माणसांच्या पापांची क्षमा केल्यावर तो ऊर्ध्वलोकी सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसला आहे. Se kapitlet |