Online Bibel

- Annoncer -




२ इतिहास 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.

Se kapitlet Kopi

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तो दान वंशातील एका स्त्रीचा पुत्र असून त्याचा बाप सोर येथला होता; तो सोने, चांदी, पितळ, लोखंड, पाषाण व लाकूड ह्यांचे काम करण्यात, जांभळे, निळे, तलम सणाचे किरमिजी कापड तयार करण्यात, कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात व सर्व प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. आपल्या कारागिरांबरोबर व माझा स्वामी आपला बाप दावीद ह्याच्या कारागिरांबरोबर त्याला कामावर नेमा.

Se kapitlet Kopi

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्यास सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दावीद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.

Se kapitlet Kopi




२ इतिहास 2:14

Følg os:

Annoncer


Annoncer