गणना 18:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास संतोष देतो. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पण गाईचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये, ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे. Se kapitlet |