यिर्मया 15:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील. जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील. लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस. Se kapitletपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो “तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणीन; तू हीणकसापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येतील, पण तू त्यांच्याकडे जाणार नाहीस. Se kapitletपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 म्हणून याहवेहने असे म्हणतात: “जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन म्हणजे तू माझी सेवा करशील; जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील, मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील. या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे, परंतु तू त्यांच्याकडे वळू नको. Se kapitlet |