2 त्यायनं ठिक तसचं लिवलं, जसं त्या व्दारे आमाले सांगतले गेले होते. त्यायनं येशूले त्याच्या सेवेच्या सुरवाती पासून पायले होते. अन् जे नंतर देवाच्या वचनाचे सेवक बनले, त्यायनं ह्या गोष्टी आमच्या परेंत पोहचवल्या.