Online Bible

- Reklamy -




सफन्या 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा, त्या दिवशी मी दोषारोप करण्यास उभा राहीन. पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन; माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण विश्व जळून भस्म होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी, आणि त्यांच्यावर मी आपला कोप व संतप्त क्रोध ओतावा, असा मी निश्चय केला आहे, कारण माझ्या क्रोधाच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.

Viz kapitola kopírovat




सफन्या 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy