तीता 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले. Viz kapitola |