प्रकटी 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा मी राजासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते; त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 नंतर मी राजासने पाहिली, त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना केली नव्हती आणि आपल्या कपाळांवर किंवा आपल्या हातांवर त्याची खूण धारण केली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यानी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. Viz kapitola |