प्रकटी 12:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 म्हणून अहो स्वर्गांनो व स्वर्गातील नागरिकांनो, उल्लास करा! पण पृथ्वी व समुद्रा तुम्हाला हाय, हाय! कारण आता आपल्यासाठी अगदीच थोडका काळ बाकी आहे, हे ओळखून सैतान अतिशय क्रोधाविष्ट होऊन तुमच्याकडे आला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 म्हणून स्वर्गांनो व त्यांत राहणाऱ्यांनो, आनंद करा!. भूमी व समुद्र ह्यांच्यावर अनर्थ ओढवला आहे, आपला काळ थोडा आहे, हे ओळखून सैतान अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.” Viz kapitola |