गणना 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु पापाची भरपाई करण्यासाठी त्या व्यक्तीचा कोणीही जवळचा नातेवाईक नसेल तर ती भरपाई याहवेहची असावी आणि पापासाठी प्रायश्चित करण्याच्या मेंढ्यासह ती याजकाकडे द्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दल परमेश्वराजवळ केलेली भरपाई याजकाची व्हावी; जो प्रायश्चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्चित्तासाठी अर्पण करण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी. Viz kapitola |