मार्क 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका उलथून टाकल्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 ते यरुशलेम येथे पोहोचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना तो बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली. Viz kapitola |