मार्क 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग ते वर यरुशलेमेस जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता; तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बारा जणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मग ते वर यरूशलेम शहराच्या वाटेने जात असता येशू त्यांच्यापुढे चालला होता. त्याचे शिष्य विस्मित झाले आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एकाबाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमकडे जात असताना येशू शिष्यांच्यापुढे चालत होता. शिष्य विस्मित झाले होते आणि मागोमाग येणारे लोक घाबरले होते. तो पुन्हा त्या बारा जणांना जवळ बोलावून आपल्या बाबतीत काय होणार,ते त्यांना सांगू लागला, Viz kapitola |