मत्तय 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुम्ही पश्चात्ताप केला, हे दर्शवण्यासाठी मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, तो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे. त्याची पादत्राणे उचलायचीदेखील माझी पात्रता नाही. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल. Viz kapitola |