मत्तय 21:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्यांना भाड्याने देऊन दुसर्या ठिकाणी राहवयास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणखी एक दाखला ऐकून घ्या : कोणीएक गृहस्थ होता, ‘त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला’ आणि तो माळ्यांना खंडाने लावून देऊन आपण परदेशी गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 “हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 आणखी एक दाखला ऐकून घ्या. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला. त्यानंतर तो द्राक्षमळा कुळांकडे खंडाने देऊन तो स्वतः परदेशी गेला. Viz kapitola |