Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्यावेळी येशू पवित्र आत्म्याद्वारे आनंदित होऊन म्हणाले, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍यांपासून या गोष्टी गुप्त ठेवल्या आणि लहान बालकांना प्रगट केल्या, म्हणून मी तुमचे आभार मानतो कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 त्याच घटकेस येशू पवित्र आत्म्यात उल्हसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे आभार मानतो कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत. होय पित्या, कारण असेच घडावे, अशी तुझी इच्छा होती.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 10:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy