लेवीय 23:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 वर्षावर्षाची सात दोषहीन कोकरे, एक गोर्हा आणि दोन मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत; त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रीत्यर्थ त्यांचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 एक गोऱ्हा, दोन मेंढे व प्रत्येकी एक वर्षाची सात नर कोकरे ही सर्व निर्दोष अशी घेऊन त्यांचा परमेश्वरासमोर अन्नार्पण आणि पेयार्पणासोबत परमेश्वरासाठी हव्य म्हणून होम करावा. त्या सुवासिक अर्पणामुळे परमेश्वरास संतोष होईल. Viz kapitola |