यहोशवा 8:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे, अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अर्पण केले आणि शांत्यर्पणे वाहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परमेश्वराचा सेवक मोशे याने इस्राएल लोकांस आज्ञा केल्याप्रमाणे, “अर्थात मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधली.” त्या दगडांना लोखंडाचा स्पर्शदेखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वरास होमबली अर्पिले आणि शांत्यर्पणाचे यज्ञ केले. Viz kapitola |