यिर्मया 30:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वर म्हणतो, हे माझ्या सेवका याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; कारण पाहा, मी दूर देशातून तुझा उद्धार करीन, बंदिवासाच्या देशातून तुझ्या वंशजांचा उद्धार करीन. याकोब परत येईल, तो विश्राम पावेल व निर्भय होईल; त्याला कोणी धाक घालणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको. कारण पाहा, मी तुला दूर स्थानातून परत आणीन आणि तुझ्या वंशजांना बंदिवासाच्या देशातून तारीन. याकोब पुन्हा येईल आणि शांती असेल; तो सुरक्षित राहील आणि तेथे कोणी दहशत घालणार नाही. Viz kapitola |