यिर्मया 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून याहवेह, इस्राएलचे परमेश्वर मेंढपाळांना जे माझ्या लोकांची राखण करतात त्यांना असे म्हणतात: “कारण तुम्ही माझ्या कळपाची पांगापांग केली व त्यांना हुसकून लावले आणि त्यांची काळजी घेतली नाही, आता तुम्ही त्यांच्याशी केलेल्या दुष्टपणाबद्दल मी तुमच्यावर शिक्षांचा वर्षाव करेन.” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यास्तव परमेश्वर, इस्राएलचा देव, त्या मेंढपाळांना, जे त्याच्या लोकांस चारतात, त्याविषयी असे म्हणतो, “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरले आणि त्यांना घालवून लावले आहे. तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही. हे जाणून घ्या, मी तुम्हास तुमच्या वाईट कृत्यांबद्दल परत फेड करीन.” परमेश्वर असे म्हणतो. Viz kapitola |