यिर्मया 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांनी असे विचारले नाही, ‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले, वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले, निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले, ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले, ते याहवेह कुठे आहेत?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्या परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून आणले, आम्हांला रानातून वैराण व खाच-खळग्यांच्या प्रदेशातून, निर्जल देशातून व मृत्युच्छायेतून नेले, ज्या प्रदेशातून कोणी जातयेत नाही व जेथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हांला नेले, तो परमेश्वर कोठे आहे?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?” Viz kapitola |