यिर्मया 13:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुझा व्याभिचार व तुझे ते कामातुरपणे खिंकाळणे, व तुझी निर्लज्ज वेश्यावृत्ती! डोंगरावर आणि शेतात चाललेली तुझी अमंगळ कामे मी बघितली आहेत. हे यरुशलेम, तुला धिक्कार असो! तू केव्हापर्यंत शुद्ध राहणार नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझे व्यभिचार, तुझे खिदळणे, तुझ्या जारकर्माचे चाळे, ही तुझी घोर कर्मे मी त्या मैदानातल्या टेकड्यांवर पाहिली आहेत. हे यरुशलेमे, तू हायहाय करणार! तू आपणाला शुद्ध करणार नाहीस काय? असे कोठवर चालणार?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तुझी जारकर्मे आणि खिदळणे, तुझ्या व्यभिचाराची दुष्टाई ही रानांतल्या डोंगरावर मी पाहिली आहेत, हे यरूशलेमे, तुला हाय! तू स्वच्छ केली जात नाही आहे, असे किती काळ चालणार? Viz kapitola |