शास्ते 6:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 नंतर गिदोन परमेश्वराला म्हणाला, “कृपा करून माझ्यावर रागावू नका. मला पुन्हा आणखी एक वेळ विनंती करू द्या. मला पुन्हा एकदा परीक्षा घेऊ द्या, परंतु यावेळी ती लोकर कोरडी असू द्या आणि पूर्ण भूमी दवबिंदूने झाकून टाका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्या जमिनीवर दहिवर पडू दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.” Viz kapitola |