शास्ते 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 इस्राएलांनी पुन्हा याहवेहचा धावा केला आणि त्यांनी त्यांना एक सोडविणारा—बिन्यामीन गेराचा पुत्र एहूद दिला, जो डाव्या हाताचा मनुष्य होता. इस्राएली लोकांनी त्याला मोआबाचा राजा एग्लोनकडे नजराणा देऊन पाठविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडवणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली. Viz kapitola |