शास्ते 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते म्हणत, “ठीक आहे मग ‘शिब्बोलेथ म्हण.’ ” जर तो “सीब्बोलेथ,” म्हणाला, कारण तो ते शब्द नीट उच्चारू शकला नाही, तर ते त्याला धरत आणि त्याला यार्देनेच्या उतारावर ठार करीत. त्यावेळी एफ्राईमचे बेचाळीस हजार लोक ठार झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने “नाही” असे म्हटले तर ते त्याला म्हणत, “शिब्बोलेथ म्हण”; तेव्हा तो “सिब्बोलेथ” म्हणे. त्या शब्दाचा उच्चार त्याला करता येत नसे म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ मारून टाकत. त्या प्रसंगी एफ्राइमातले बेचाळीस हजार प्राणास मुकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तर ते त्यास म्हणत, “आता तू शिब्बोलेथ असे म्हण,” तेव्हा तो “सिब्बोलेथ” असे म्हणत असे (कारण त्यांना त्या शब्दाचा बरोबर उच्चार करता येत नव्हता). मग ते त्यास धरून यार्देनेच्या उताराजवळ जिवे मारत असत; तर त्या वेळी एफ्राइमातली बेचाळीस हजार माणसे मारली गेली. Viz kapitola |