हाग्गय 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा शल्तीएलाचा पुत्र जरूब्बाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा ह्यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर ह्याच्या वाणीस मान दिला, आपला देव परमेश्वर ह्याने पाठवलेल्या हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली आणि ते लोक परमेश्वराचे भय धरू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा मुलगा यहोशवा व उरलेले सर्व लोक यांनी, आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हाग्गय संदेष्ट्याची वचने मानली, कारण आपला देव परमेश्वर ह्याने त्यास पाठवले होते आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले. Viz kapitola |