उत्पत्ती 50:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “माझ्या वडिलांनी मला शपथ घ्यायला लावली आणि म्हणाले, मी मरणार आहे; कनान देशात मी स्वतःसाठी खोदलेल्या थडग्यात मला मूठमाती दे. आता मला वर जाऊन माझ्या वडिलांना मूठमाती देऊ दे. मग मी परत येईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 माझ्या बापाने माझ्याकडून आणभाक घेऊन म्हटले की, ‘पाहा, मी आता मरणार; तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदवून घेतली आहे तिच्यात मला नेऊन मूठमाती दे.’ मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरू द्यावे. मी परत येईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन. Viz kapitola |