गलतीकरांना 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याउलट, त्यांनी ओळखले की सुंता न झालेल्या लोकांमध्ये शुभवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य मला सोपविण्यात आले आहे, ज्याप्रकारे पेत्राला सुंता झालेल्या लोकांमध्ये कार्य करण्याचे सोपविण्यात आले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर उलट, जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे असे त्यांनी पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 उलट, ज्याप्रमाणे सुंता झालेल्या म्हणजेच यहुदी लोकांना शुभवर्तमान घोषित करण्याचे काम देवाने पेत्रावर सोपवले होते त्याचप्रमाणे सुंता न झालेल्या लोकांना म्हणजेच यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्याचे काम देवाने माझ्याकडे सोपवले आहे, हे त्यांनी ओळखले Viz kapitola |