निर्गम 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग त्याने त्याला सांगितले, “पुन्हा आपला हात छातीवर ठेव ” तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेवला, आणि छातीवरून बाजूला काढला तेव्हा पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला. Viz kapitola |