निर्गम 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ते तुझे ऐकतील, मग तू व इस्राएलाचे वडीलजन मिळून तुम्ही मिसराच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्री लोकांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे. आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी म्हणून आम्हांला तीन दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ दे. Viz kapitola |