निर्गम 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 देव मोशेला असे म्हणाला, “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हांकडे पाठवले आहे. हेच माझे सर्वकाळचे नाव आहे, व हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल; Viz kapitola |