निर्गम 12:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 “तुमच्याबरोबर राहणार्या विदेशी व्यक्तीला याहवेहचा हा वल्हांडणाचा सण पाळावयाचा असेल, तर त्यांच्यातील सर्व पुरुषांनी सुंता करवून घ्यावी; मगच ते या देशात जन्मलेल्याप्रमाणे हा सण पाळू शकतील. कोणत्याही बेसुंती पुरुषाने ते खाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तुमच्याबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळणार असेल, तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी; मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे; पण कोणा बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 परदेशीय एकजण तुम्हाबरोबर राहत असेल व जर त्यास परमेश्वराच्या वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी होण्याची इच्छा असेल तर त्याने सुंता करून घेतलीच पाहिजे. म्हणजे मग तो इस्राएल लोकांसारखा रहिवासी होईल. मग त्याने वल्हांडण सणाच्या भोजनात सहभागी व्हावे; परंतु त्याने सुंता करून घेतली नाहीतर त्यास त्यातले काही खाता येणार नाही. Viz kapitola |