अनुवाद 14:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये; तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपर्याला ते खायला द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्यास तो खायला हरकत नाही किंवा त्यास तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका. Viz kapitola |