प्रेषित 26:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि त्याप्रकारे मी यरुशलेममध्ये केले होते. तिथे प्रभूच्या अनेक लोकांना महायाजकाच्या अधिकाराने तुरुंगात डांबले आणि त्यांचा वध करण्याकरिता मी संमती देत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि तसे मी यरुशलेमेत केलेही; मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले; आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि नक्की हेच मी यरूशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि तसे मी यरुशलेममध्ये केलेसुद्धा. मी मुख्य याजकांकडून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात टाकले आणि त्यांचा वध होत असताना मी संमती दिली. Viz kapitola |