प्रेषित 16:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 परंतु पौल अधिकार्यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमी माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे घालवतात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 परंतु पौल त्यांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हास उघडपणे फटके मारून बंदिशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 परंतु पौल शिपायांना म्हणाला, “आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरवल्यावाचून त्यांनी आम्हांला उघडपणे फटके मारून तुरुंगात टाकले आणि आता ते आम्हांला गुप्तपणे पाठवतात काय? हे चालणार नाही, त्यांनी स्वतः येऊन आम्हांला बाहेर काढावे.” Viz kapitola |