2 तीमथ्य 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी निरंतर प्रार्थनेत तुझी आठवण करताना, ज्या माझ्या पूर्वजांच्या परमेश्वराची मी शुद्ध मनाने सेवा करतो, त्यांचे आभार मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3-4 मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3-4 मी माझ्या प्रार्थनेत रात्रंदिवस तुझे स्मरण करतो आणि तुझे अश्रू आठवून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या प्रांजल विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो. Viz kapitola |