२ शमुवेल 3:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 नंतर त्या सर्वांनी येऊन दावीदाने दिवस असताच काही खावे अशी विनंती केली; पण दावीद शपथ घेत म्हणाला, “सूर्यास्ताच्या आधी मी भाकर किंवा काहीही सेवन केले, तर परमेश्वर मला कठोर शासन करोत!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता. Viz kapitola |