२ राजे 21:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु लोकांनी ऐकले नाही. मनश्शेहने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणून त्यांनी ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता अशा राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण त्यांनी ऐकले नाही. मनश्शेने त्यांना एवढे बहकवले की इस्राएलांदेखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्यापेक्षाही ते अधिकच दुष्कर्म करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते. Viz kapitola |