२ राजे 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग तो पाण्याच्या झर्याजवळ गेला आणि ते मीठ पाण्यात टाकून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मी या पाण्याला बरे केले आहे. येथून पुढे या पाण्यामुळे मृत्यू येणार नाही किंवा भूमी नापीक राहणार नाही.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग तो पाण्याच्या झर्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो, ह्यापुढे ह्याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला आणि त्यामध्ये ते मीठ टाकून म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ‘आता हे पाणी मी बरे केले आहे. आता यापुढे आणखी मृत्यू किंवा नापिकी आणखी होणार नाही.” Viz kapitola |