२ इतिहास 35:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु नखोने त्याच्याकडे दूत पाठवून सांगितले, “यहूदीयाच्या राजा, तुझ्या आणि माझ्यामध्ये काय भांडण आहे? यावेळेस मी तुमच्यावर नव्हे तर या घराण्याबरोबर मी युद्ध करीत आहे, त्याच्यावर हल्ला करीत आहे. परमेश्वराने मला घाई करण्यास सांगितले आहे; म्हणून परमेश्वराला विरोध करणे थांबव, ते माझ्याबरोबर आहेत, नाहीतर ते तुझा नाश करतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण त्याने त्याच्याकडे आपले वकील पाठवून सांगितले की, “यहूदाच्या राजा, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? आज मी तुझ्यावर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे; देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नकोस; त्याने तुझा नाश करावा असे न होवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्यास कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील. Viz kapitola |