२ इतिहास 31:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राजाने सकाळ आणि संध्याकाळच्या होमार्पणासाठी आणि शब्बाथ, नवचंद्र आणि याहवेहच्या नियमात लिहिल्याप्रमाणे ठरवून दिलेल्या सणांसाठी स्वतःच्या मालमत्तेतून दान दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग त्याने आपल्या संपत्तीतून होमार्पणासाठी राजभाग ठरवला; परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे नित्य सकाळची व संध्याकाळची होमार्पणे, शब्बाथ, चंद्रदर्शने व नियतपर्वे ह्यांच्या होमबलींसाठी त्याने राजभाग ठरवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या होमार्पणा खातर त्यांचा उपयोग करण्यात आला. शब्बाथ, चंद्रदर्शने व इतर उत्सव कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहीले आहे. Viz kapitola |