२ इतिहास 29:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी शुद्धीकरण सुरू केले आणि पहिल्या महिन्याच्या आठव्या दिवशी ते याहवेहच्या मंदिराजवळ पोहोचले. आणखी आठ दिवस त्यांनी पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी काम पूर्ण करून याहवेहचे मंदिर पवित्र केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस त्यांनी पवित्रीकरणास आरंभ केला व त्याच महिन्याच्या अष्टमीस ते परमेश्वराच्या देवडीपर्यंत आले; त्यांनी परमेश्वराचे मंदिर आठ दिवसांत पवित्र केले; पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी सर्व काम त्यांनी समाप्त केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुद्धता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले. Viz kapitola |