२ इतिहास 25:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तो बोलत असतानाच राजा त्याला म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार नेमला आहे का? थांब! का बरे तू मारला जावास?” तेव्हा तो संदेष्टा थांबला व म्हणाला, “मला माहीत आहे की परमेश्वराने तुझा नाश करण्याचे ठरविले आहे, कारण तू असे केलेस आणि माझा सल्ला ऐकला नाहीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.” Viz kapitola |