२ इतिहास 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यरुशलेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहज्या2 ह्याला राजा केले, कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता. ह्या प्रकारे अहज्या बिन यहोराम हा यहूद्यांचा राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला. Viz kapitola |