१ शमुवेल 26:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तू जे केलेस ते चांगले नाही. जिवंत याहवेहची शपथ, तू आणि तुझी माणसे मेलीच पाहिजेत, कारण तू तुझ्या मालकाचे, याहवेहच्या अभिषिक्ताचे रक्षण केले नाहीस. तुझ्या सभोवती पाहा. राजाचा भाला आणि पाण्याचा चंबू जे त्यांच्या उशाशी होते ते कुठे आहेत?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तू हे जे काम केले ते काही चांगले नव्हे; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात, कारण प्रभू परमेश्वर ह्याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही. राजाचा भाला व त्याच्या उशाजवळ असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे तो पाहा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?” Viz kapitola |