१ राजे 6:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 त्याने ते करूब, त्यांचे पंख पसरलेले असे मंदिराच्या अगदी आतील खोलीत ठेवले. एका करुबाचे पंख एका भिंतीला स्पर्श करत होते, तर दुसऱ्या करुबाचे पंख दुसर्या भिंतीला स्पर्श करत होते आणि त्यांचे पंख खोलीच्या मध्यभागी एकमेकांना स्पर्श करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 आतल्या गाभार्यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्या करूबाचा एक पंख दुसर्या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते. Viz kapitola |