१ करिंथ 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आता, बंधूंनो व भगिनींनो, या गोष्टी मी तुमच्या हिताकरिता स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत यासाठी की, “जे लिहिलेले वचन आहे त्यापलीकडे जाऊ नका.” या म्हणीचा अर्थ तुम्ही आम्हाकडून शिकावा. आमच्यापैकी एकाचा अनुयायी म्हणून फुगून जाऊन दुसर्याला कमी लेखू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बंधुजनहो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसर्यावर फुगणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 बंधुजनहो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी उदाहरणादाखल स्वतःला व अपुल्लोसला लागू केल्या आहेत. ह्यासाठी की, धर्मशास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आमच्याकडून शिकावा, म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा अभिमान बाळगणार नाही. Viz kapitola |