१ इतिहास 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन तरुण व सुकुमार आहे, आणि जे मंदिर परमेश्वराप्रीत्यर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशांत विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे.” ह्या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन अजून तरुण व अननुभवी आहे आणि परमेश्वराचे मंदिर मात्र विशेषतः उत्कृष्ट बांधले गेले पाहिजे, याकरिता की सर्व इतर देशात सुप्रसिध्द आणि वैभवशाली असे झाले पाहिजे. म्हणून मी त्याच्या बांधण्याची तयारी करीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी बरीच तयारी केली. Viz kapitola |