१ इतिहास 17:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी त्यांचा उद्धार करायला देव स्वतः गेला, ह्यासाठी की जी तुझी प्रजा तू मिसर देशातून सोडवलीस तिच्यादेखत मोठी व भयानक कृत्ये करून व इतर राष्ट्रांना घालवून देऊन तू आपले नाव करावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि तुझ्या इस्राएल लोकांसारखे दुसरे कोठले राष्ट्र पृथ्वीवर आहे ज्यांना तू, आपलेच लोक व्हावेत, म्हणून देव स्वतः त्यांना मिसरातून सोडवण्यास गेला; या तुझ्या लोकांस तू मिसरातून सोडवले तिच्या देखत महान व भयानक कृत्ये करून तू आपले नाव केले. ज्यांना तू मिसरातून सोडवले होते, त्या तुझ्या लोकांपुढून इतर राष्ट्रांस घालवून दिले. Viz kapitola |