प्रकटी 18:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ‘दिव्याचा उजेड’ तुझ्यात ह्यापुढे दिसणारच नाही; ‘आणि नवरानवरीचा शब्द’ तुझ्यात ह्यापुढे ऐकू येणारच नाही; तुझे ‘व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक’ होते; आणि सर्व राष्ट्रे ‘तुझ्या चेटकाने’ ठकवली गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि तुझ्यात दिव्याचा उजेड. ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 दिव्यांचा उजेड ह्यापुढे तुझ्यात दिसणार नाही आणि वधूवरांची वाणी ह्यापुढे तुझ्यात ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली होती!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 दिव्यांचा प्रकाश यापुढे तुझ्यावर उजळणार नाही आणि वधूवरांची वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते. सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठकविली गेली होती. Viz kapitola |